HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोडले ‘वर्षा’ निवासस्थान

मुंबई। ‘मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्री वर हलवत आहे. मला कोणत्याही गोष्टीचा मोह नाही,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंड केलेल्या आमदारांना फेसबुक लाईव्हद्वारे सांगितले. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब वर्षा शासकीय निवासस्थान सोडून मातोश्रीमध्ये राहण्यास गेले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक वर्षा दाखल झाले होते.  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३५ आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्याचे राजकारण चांगले ढवळून निघाले आहे. राज्यात दोन दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेसह बंड पुकारलेल्या आमदरांशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडून नये, म्हणून शिवसैनिक वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…, आवाज कुणाच… शिवसेनेचा, या घोषणांनी वर्षा बंगल्याचा  परिसरात देण्यात आल्या होत्या. वर्षा बंगल्यातून उद्धव ठाकरे बाहेर आल्यावर त्यांच्यावर शिवसैनिकांनी पुष्पवृष्टी केली. वर्षा बंगल्याचा परिसर शिवसैनिकांनी फुलून गेला होता की, उद्धव ठाकरेंना त्या गाडीपर्यंत मार्ग काढता येत नव्हते.
संबंधित बातम्या

Related posts

आपले राजकीय मतभेद असतील पण आम्ही सूडाने वागणारे नाही !

News Desk

माझा नवरा मुस्लीम आहे तर मी एक अभिमानी हिंदू !

News Desk

दारुच्या प्रतिकात्मक बाटल्यांवर मुख्यमंत्र्यांचा फोटो

News Desk