HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकद्वारे राज्यातील जनतेला संबोधित करणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांच्यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने, असे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत दिले आहे. यामुळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का? आज (22 जून) घेण्यात येणाऱ्या फेसुबक लाईव्हमधून कळेल.

 

तत्पूर्वी, विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थकांसह गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. शिवसेनेच्या आमदारांची तातडीची बैठक बोलवली होती. यासाठी शिवसेनेने बंडखोर आमदारांना विधीमंडळ मुख्य प्रतोद पदी सुनील प्रभू पत्र लिहिले होते. या पत्रानुसार  या पत्रानुसार बैठकीत हजर न राहिल्याचे निर्देश दिले असून बैठकीला आमदार गैरहजर राहिल्यास शिवसेनेकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा पत्रातून दिला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत सुनील प्रभू यांची विधीमंडळ मुख्य प्रतोद पदी हकालपट्टी केली आणि त्यासाठी विधीमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

एकनाथ शिंदेंनी केली सुनील प्रभू यांची विधीमंडळ मुख्य प्रतोद पदावरून उचलबांगडी

 

Related posts

जाधवांची भेट घेणे ठाकरेंनी नाकारले

News Desk

आजोबांचा अपमान झाला म्हणून सुजयने पक्ष सोडला !

News Desk

काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित उद्या शिवसेनेत करणार प्रवेश

News Desk