HW News Marathi
राजकारण

आम्ही नटरंगसारखे काम कधी केले नाही !

मुंबई | “कुस्ती पैलवानांशी होते. या ‘अशांशी’ नाही”, असे म्हणत हातवारे करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांवर टीका करताना यावेळी शरद पवार यांनी केलेल्या हातवाऱ्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. “आम्ही नटरंगसारखे काम कधी केले नाही. त्यामुळे, आम्ही हातवारे करू शकत नाही. आम्हाला असे हातवारे करणेही शोभत नाही. आमची ती संस्कृती नाही”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“इतकी वर्षे महाराष्ट्रात काम केलेले राष्ट्रीय नेते असलेल्या शरद पवारांना आता पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे, त्यांची विवेकबुद्धी कमी व्हायला लागली आहे. म्हणूनच, पवार साहेब कशापद्धतीने हातवारे करून बोलायला लागले आहेत हे आपण पहिले असेल. आम्हालाही प्रत्युत्तर देता येते. पण आम्ही नटरंगसारखे काम कधी केले नाहीत. त्यामुळे, आम्ही तसे हातवारे करू शकत नाही. आम्हाला तसे हातवारे करणे शोभत नाही. आता येत्या २४ तारखेला महाराष्ट्राची जनताच त्यांना दाखवून देईल कि कोण खरा पैलवान आहे”, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राज्यातील आगामी विधानसभेचा प्रचार आता ऐन रंगात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, आता सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (१२ ऑक्टोबर) झालेल्या बार्शीच्या प्रचारसभेत प्रत्युत्तर दिले. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शरद पवारांनी केलेल्या हातवाऱ्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा शरद पवारांना लक्ष्य केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारने ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरुच ठेवावे, रोहित पवारांची मागणी

News Desk

कर्जमाफीसाठीही शेतकऱ्याला ‘अटी व शर्ती’ आणि ‘ऑनलाइन’ नावाखाली रडवले गेले !

News Desk

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सूत्र हलवावीत हा त्यांचा डावपेच !

News Desk