HW Marathi
देश / विदेश राजकारण

काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी उमेदवार यादी जाहीर ,माणिकराव ठाकरे यांना पुन्हा संधी

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. नऊ जणांपैकी महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश या यादीत आहे.काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे. ठाकरे यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसंच मुंबई दक्षिण-मध्यमधून एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

नंदुरबार – के. सी. पडवी

धुळे – कुणाल रोहिदास पाटील

वर्धा – चारुलता टोकस

मुंबई दक्षिण मध्य – एकनाथ गायकवाड

यवतमाळ-वाशिम – माणिकराव ठाकरे

शिर्डी- भाऊसाहेब कांबळे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नवीनचंद्र बांदिवडेकर

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आता सर्वच पक्षांनी उमेदवार जाहीर करत प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीकरता आघाडी केली आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी लागणार आहे.

Related posts

स्मृतींचा पाठलाग, चार महाविद्यालयीन तरूण पोलिसांच्या ताब्यात

News Desk

माझी काहीही तक्रार नाही, एका माजी मुख्यमंत्र्याशी असे बोलणे योग्य नव्हते !

News Desk

#LokSabhaElections2019 : थोड्याच वेळात जाहीर होणार भाजपची पहिली उमेदवार यादी

News Desk