Site icon HW News Marathi

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा

मुंबई | नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. काँग्रेसकडून डॉ. सत्यजीत तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, काँग्रेसने (Congress) आज (12 जानेवारी) अधिकृत पत्राद्वारे सुधीर तांबे यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले. या मतदारसंघासाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी देण्यात येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदावारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटचा दिवस आहे.  काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधीर तांबे आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवाऱ्याचे नाव दिले आहे. परंतु अद्यापही भाजपकडून उमेदवारी दिलेला नाही. भाजपकडून धनंजय जाधव हे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उमेदवारी मागितल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. धनंयज जाधव हे वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्यांदाच नगरसेवक झाली होती.

 

 

Exit mobile version