Site icon HW News Marathi

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; पोलिसांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांना घेतले ताब्यात

मुंबई | काँग्रेससने (Congress) महागाईविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महागाईविरोधात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वात मुंबईतील विधिमंडळासमोर आंदोलन करण्यासाठी जात होते. तेव्हाच पोलिसांनी काँग्रेस नेत्यांची धरपकड केली. यात पोलिसांनी  नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना अटक केल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीट करतर ही माहिती दिली आहे. या महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीटमध्ये लिहिले की, “महागाईविरोधात राज्यव्यापी आंदोलन पुकारल्यामुळे कॉंग्रेस नेत्यांना अटक! ED सरकारच्या दबावतंत्रासमोर आम्ही झुकणार नाही, जनतेचे प्रश्न मांडण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही. #महंगाई_पर_हल्ला_बोल”. 

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अशोक चव्हाण, माजी वर्षा गायकवाड आदी नेत्यांना तब्यात घेतले आहे.

 

 

 

Exit mobile version