Site icon HW News Marathi

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सोनिया गांधी सहभागी; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

मुंबई | काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सध्य देशात ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. राहुल गांधींची ही यात्रा आज ( ७ सप्टेंबर) कन्याकुमारी येथून सुरू झाली होती. कर्नाटकातील मांड्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)  सहभागी झाल्या आहेत. सोनिया गांधी पदयात्रेत सहभागी झाल्यामुळे राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यक्रर्ते उत्साह पाहायला मिळाला.

दरम्यान, सोनिया गांधी जकन्नाहल्ली येथे पोहचल्या आणि पांडवपुरा तालुक्यातून सकाळी साडेसहा वाजता पदयात्रेत सहभागी झाल्या आजही पदयात्रा संध्याकाळी सातवाजता नागमंगळा तालुक्यात संपणार असून या पदयात्रेनंतर ब्रम्ह्मदेवराहल्ली गावात सभा होणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, “सोनिया गांधी या यात्रेत सहभागी झाल्या हा ऐतिहसिक क्षण असून त्यांच्या सहभागाने कर्नाटकात काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी येईल”. सध्या ही यात्रा कर्नाटकमधील म्हैसूर येते पोहोचली आहे. ही यात्रा कन्याकुमारी ते कशमीर असा ३ हजार ५७० किलोमीटरचा प्रवास असणार आहे.

काँग्रेस अध्यक्षावरून घमासान

सध्या काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर देशभरात चर्चा सुरू आहे.  काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला पार पडणार असून १९ ऑक्टोबरला याचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे राज्यसभा खासदार मलिकाअर्जुन खरगे विरुद्ध काँग्रेसचे लोकसभेचे खासदार शशी थरूर यांच्यात काँग्रेस अध्यक्ष पदावरून थेट सामना पहायला मिळणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव देखील काँग्रेस अध्यक्ष पदाच्या चर्चेत रंगले होते. पण, अखेर गेहलोत यांनी दिल्लीत जाऊन  सोनिया गांधींची भेट काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. राजस्थानमधील राजकीय परिस्थिती पहाता, निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सुद्धा काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. दिग्विजय सिंह यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर म्हणाले, “निवडणूक लढण्याऐवजी मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठिंबा देत असून त्यांच्या विरोधात लढण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. मी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केले आणि पुढेही पक्षासाठी काम करत राहणार आहे.”

सोनिया गांधींच्या सहभागाने या यात्रेतून येत्या दिवसांत काँग्रेसला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत किती फायदा होणार हे पाहावे लागणार आहे.

Exit mobile version