Site icon HW News Marathi

राहुल गांधींनी फोनवरून संजय राऊतांच्या तब्येतीची केली विचारपूस

मुंबई | काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात ‘भारत जोडो यात्रा’ सुरू आहे. राहुल गांधींनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती त्यांनी आज (21 नोव्हेंबर) त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून दिली आहे. यानंतर राऊतांनी माध्यमांशी बोलताना देखील राहुल गांधींनी फोन करून त्यांची चौकशी केल्याची त्यांनी सांगितले.

राऊतांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय..”

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “राहुल गांधींनी मला काल रात्री फोन केला होता. यापूर्वीही राहुल गांधींनी माझी चौकशी केली होती. ते भारत जोडो यात्रेत व्यस्त असतानाही त्यांनी वेळ काढून त्यांनी मला फोन केला. राजकारणात आज कोणी कोणाचा मित्र राहिलेला नाही. मी तुरुंगात असताना माझ्या घरी किती लोक आले. या सर्वांची मला कल्पना आहे. तर किती लोकांनी माझ्या कुटुंबियांकडे माझी चौकशी केली, यांची मला कल्पना आहे.  माझ्या कुटुंबियांशी ठाकरे कुटुंबिय, आमचा पक्ष, शरद पवार, पवार कुटुंबिय आणि काँग्रेसचे आमचे इतर सहकारी यांनी माझी वेळोवेळी चौकशी केली.  राज्यातील प्रत्येक पक्षात माझे जुने सहकारी आहेत. परंतु, त्यातील किती जण तुरुंगात असताना आले?, अशा वेळी राजकीय मतभेद असले तरी गांधी कुटुंबियांनी माझी चौकशी केली. तुरुंगातून सुटल्यानंतर तुमची प्रकृती खालावली होती, असे ही ते म्हणाले.

 

Exit mobile version