Site icon HW News Marathi

“राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे ‘मविआ’मध्ये फूट पडू शकते”, संजय राऊतांचे संकेत

मुंबई | “वीर सावरकर यांच्या बद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) फूट ही पडू शकते”, असे संकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहे. राहुल गांधींना (Rahul Gandhi) वीर सावरकरांबद्दल (Veer Savarkar) केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात ठिक ठिकाणी त्यांच्याविरोधात आणि निषेद सुरू आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गुरुवारी (17 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन राहुल गांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे म्हणत त्याची भूमिका स्पष्ट केली. यानंतर राऊतांनी आज (18 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना ‘मविआ’मध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यासंदर्भात आता उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

संजय राऊत म्हणाले, “वीर सावरकर हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते. असे इतिहास सातोय. परंतु, आता राजकारणासाठी त्यांनी वीर सावरकरांचा विषय त्यांनी घेतलेला आहे. किंबहुना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना स्थापनेपासून वीर सावरकर आणि हिंदूत्वाचा पुरस्कार केला आहे. भारत जोडो यात्रा वीर सावरकराचा मुद्दा आणण्याची गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पड शकते. हे मी तुम्हाल सांगतोय, कारण आम्ही वीर सावरकर हे आमचे श्रद्धास्थान मानतो.”

वीर सावरकरांचा विषय काढायचे काही कारण नव्हते

महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे भाजपने वीर सावरकारांचा विषय काढल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, “काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलेले आहे. वीर सावरकरांची कोणत्याही प्रकरे बदनामी, त्यांच्या विषयीचे चुकीचे वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. खरे म्हणजे या देशातील जे वातावरण आहे. हुकूमशाहीकडे नेहणारे, देशाला पुन्हा पुन्हा गुलामगिरीच्या बेड्या ठोकणारे, महागाई, बेरोजगारी असेल, महिलांवरील अत्याचार असतील, अशा विषयांवर त्यांची भारत जोडो यात्रा आहे. ही यात्रा सुरु असताना. वीर सावरकरांचा विषय काढायचे काही कारण नव्हते. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असे नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसलाय. महाराष्ट्रत आणि देशाच्या मोठ्या वर्गाला वीर सावरकरांविषयी आदर आहे.”

नवा इतिहास निर्माण करावा

“इतिहास काळात काय घडले आणि काही नाही घडले. हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा,  या मताचे आम्ही आहोत. आणि राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावे. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावे, अशी आमची मागणी आहेत. मला कळत नाही, हे जे नवे सावरकर भक्त देशात निर्माण झालेत. मग, ते भाजप किंवा इतर काही लोक असतील. ते ही आमची सावरकरांना भारतरत्न द्यावे, ही मागणी का?, का उचलून धरत नाही,” असे राऊत म्हणाले.

 

 

Exit mobile version