HW Marathi
देश / विदेश राजकारण

लोकसभेनंतर काँग्रेस पक्ष मोठ्या आर्थिक संकटात ? 

नवी दिल्ली । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला समोरे जावे लागल्यानंतर आता काँग्रेस मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून त्यांच्या अनेक विभागांना खर्चात कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पक्षाकडून अनेक विभागांच्या निधीत तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनात देखील कपात करण्यात आली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पक्षांतर्गत निर्माण झालेल्या या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सेवादलाच्या मासिक खर्चात कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महिला काँग्रेस, नॅशनल स्टुडेंट युनियन ऑफ इंडिया आणि युवक काँग्रेसला देखील पक्षाकडून खर्च कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.

इतकेच नव्हे तर लोकभेनंतर काँग्रेस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन देखील थकले आहे. लोकसभेनंतर आता पक्षाच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. काँग्रेसच्या मीडिया विभागात ५५ कर्मचाऱ्यांपैकी आता केवळ ३६ कर्मचारीच शिल्लक राहिले आहेत

Related posts

यापुढे युती नाही | उद्धव ठाकरे

News Desk

भाजप-काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू !

Gauri Tilekar

तृप्ती देसाई लवकरच सबरीमाला मंदिरात प्रवेश करणार

News Desk