HW News Marathi
राजकारण

सोनिया गांधी-स्मृती इराणींच्या भांडणात सुप्रिया सुळेंच्या मध्यस्तीने वाद निवळला

नवी दिल्ली | देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्यासंदर्भात काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी ‘राष्ट्रपत्नी’ असा उल्लेख केल्यामुळे लोकसभेत आज (28 जुलै) मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला. लोकसभेत अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात भाजपच्या नेत्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याविरोधात घोषणा देत ‘सोनिया गांधी राजीनामा द्या’ अशा घोषणाबाजी देण्यात आल्या. यामुळे लोकसभेत तणाव निर्माण झाला. या संपूर्ण परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी मध्यस्थी करत वाद निवळला.

अधीर रंजन चौधरी यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. चौधरींनी ‘राष्ट्रपत्नी’ शब्द वापरल्यामुळे भाजपचे नेत्यांनी लोकसभेत काँग्रेसविरोधात संताप व्यक्त केला. या प्रकरणामुळे संसदेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. यानंतर सोनिया गांधींनी त्यांच्या विरोधात निर्दशन करणाऱ्या भाजप खासदार विरोध करत होते, त्या भाजपच्या खासदार रमा देवी यांच्या जवळ गेल्या म्हटल्या की,  जर एखाद्या व्यक्तीकडून चुकून राष्ट्रपती ऐवजी राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला याबद्दल चौधरींनी याबद्दल माफी देखील मागितली आहे. सोनिया गांधींनी त्यांना विचारले की, या संपूर्ण प्रकरणात ‘तुम्ही माझे नाव का घेत आहात?,’ असा सवाल सोनिया गांधींनी रमा देवींना विचारल्यावर स्मृती इराणींनी मध्यस्थी केली म्हणाल्या की, त्यांनी नाही तर आपले नाव मी घेतले, असे म्हटले. सोनिया गांधींनी रागात  ‘तुम्ही माझ्याशी बोलू नका,’ (Dont talk to me), असे म्हटले.

दरम्यान, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी सोनिया गांधींच्या जवळ गेली आणि सर्व गोंधळ पाहून त्यांना दोन वेळा घरी जाण्याची विनंती केली.  यानंतर सोनिया गांधी सुप्रिया सुळेंसोबत निघाला. सुप्रिया सुळेंनी त्यांना गाडीपर्यंत सोडले आणि त्या तेथून निघून गेले. यावेळी सोनिया गांधींनीही वा न घालता येथून निघून घेतला, ” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावर पुढची सुनावणी २७ जुलैला,सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष!

News Desk

रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ मुंबई सरचिटणीस पदी रतन अस्वारे यांची नियुक्ती

News Desk

…जेव्हा तुम्हाला परदेशी माध्यमे खरेदी करता येत नाहीत !

News Desk