HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

विरोधकांना संपविण्यासाठीचे षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही !

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुका आता अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आता सत्ताधारी भाजपला इशारा दिला आहे. “सध्या शहरात कायदा सुव्यस्थेचे प्रश्‍न निर्माण होत आहेत. समाजातील जातीय सलोखा बिघडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधारी पक्ष राज्यात, देशात ठिकठिकाणी सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना संपविण्यासाठी षडयंत्र रचत आहे. मात्र, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही”, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. ते पिंपरी येथील एका खासगी कार्यक्रमात बोलत होते.

लोकसभा निवडणुकांमधील दारुण पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. “आम्ही पिंपरी-चिंचवड शहरात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला मात्र सत्ताधारी पक्ष मात्र त्यांच्या सत्तेचा करत आहे. समाजातील जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांना संपविण्यासाठी रचण्यात येत असलेले हे षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही. निवडणुकीत यश-अपयश येतेच. मात्र, विजयाने हुरळून जायचे नसते आणि प्रभावाने खचून जायचे नसते”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Related posts

माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन

News Desk

महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर

News Desk

माझगाव डॉकमध्ये आयएनएस विशाखापट्टणमव युद्धनौकेवर भीषण आग

News Desk