Site icon HW News Marathi

शिवसेना-शिंदे वादविवाद प्रकरणी 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल तर 5 जणांना अटक

मुंबई | शिंदे गट आणि शिवसेना दोन्ही गटात अनंद चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीमध्ये मध्य रात्री वाद झाला होता. यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले होते. या प्रकरणाची दादर पोलीस (Police) स्टेशन परिसरात दोन्ही गट आमने-सामने आले होते. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, सरवणकरांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे.  या प्रकरणी दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले पाच जणांना अटक केली आहे. यात शिवसेनेचे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे. शिंदे गटाचे संतोष तेलवणे यांना मारहाण झाली असून त्यांनी फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेकडून गणपती विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्तांचे स्वागतासाठी मंच उभारण्यात आला होता. पण, शिवसेनेच्या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील मंच उभार केला होता. या मंचावरून सरवणकरांचे चिरंजीव समाधान सरवणकरांनी म्याव म्याव म्हणत शिवसेनेचे नेत्यांना चिडविले होते. यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. या शाब्दिक चकमकीचे रुपांतर भांडणात झाले. या प्रकरणामुळे दादर परिसरातील तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. या प्रकरणावर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर काहीसा कमी झाला होता. शिंदे गटाच्या लोकांना सत्तेचा माज आला आहे. शिवसैनिक सगळे हे सहन करायचे का?, आमच्या विभाग प्रमुखांना गोळीबारातून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे.

पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले

या प्रकरणी दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात शिवसेनेचे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे. शिंदे गटाचे संतोष तेलवणे यांना मारहाण झाली असून त्यांनी फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधारे पोलिसांनी महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केले आहे. पोलिसांनी शिंदे गटाची बाजू ऐकली असून शिवसैनिकांची बाजू ऐकली नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या शिवसैनिकांवर भारतीय दंड कलम 143, 147, 148, 149, 395, 324, 323, 504, 506 आदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Exit mobile version