HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

‘शिवाजी पार्क’वरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही का?

मुंबई | नवरात्रीचा सण जवळ आला आहे. मात्र नवरात्रोत्सवानंतर (Navratri 2022) येणाऱ्या दसऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घेणार की पक्षावरच दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेणार याची उत्कंठा वाढू लागली आहे. कारण मेळावा कोण घेणार यावरून दोन्ही गटांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. पण शिवाजी पार्कवर होणारा हा मेळावा उद्धव ठाकरेंसाठी आणि शिंदेंसाठी इतका महत्त्वाचा का आहे? हे आपण जाणून घेऊयात.

दसरा मेळाव्यावरून शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद सुरू झाला आहे. शिवाजी पार्कवर वार्षिक दसरा मेळावा घेण्याच्या परवानगीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. असं असताना, मुंबई महानगरपालिकेने या दोन गटांकडून प्राप्त झालेल्या दोन्ही अर्जांवर आपल्या विधी विभागाकडून कायदेशीर मत मागवलं असल्याचं समजतंय. पण ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांसाठी या दसरा मेळाव्याचे महत्त्वही तितकेच मोठे आहे.

शिवसेना आणि दसरा मेळावा 

सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जर का तुम्ही एखाद्या जुन्या शिवसैनिकाला विचारलात की तुमच्या डोळ्यांसमोर येणारी शिवसेना म्हणजे नक्की काय? तर त्या शिवसैनिकाच्या आठवणीत ही एक गोष्ट नक्कीच असेल ते म्हणजे दसऱ्याच्या दिवशी शिवसैनिकांनी भरून गेलेल्या शिवाजी पार्कात भाषणासाठी कमरेवर हात ठेऊन उभे असलेले बाळासाहेब ठाकरे! १९६६ साली शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या निमित्ताने सेनेचा पहिला मेळावा पार पडला, ज्यावेळी बाळासाहेबांनी पक्षाची स्थापना केलेली. तेव्हापासूनच ही परंपरा सुरू झाली. गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून शिवसेना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत आलीये. त्यानंतर दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे एक समीकरण बनलं.

बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंकडे पक्षाची धुरा 

फक्त बाळासाहेबच नाहीत तर त्याहीआधी म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंपासून आता आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत, अशा ठाकरे कुटुंबातल्या चारही पिढ्यांसाठी दादरमधलं शिवाजी पार्क मैदान महत्त्वाचं ठरलंय. बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वर्षं शिवाजी पार्कच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केलं. शिवसेनेची राजकीय भूमिका काय ती याच भाषणातून स्पष्ट व्हायची. मग बाळासाहेबांनंतर पक्षाची सूत्रं ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आली आणि मग पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे सुद्धा दसरा मेळाव्याचं मुख्य भाषण करु लागले. त्यामुळे शिवसेनेची ही परंपरा पक्षाची ओळख ठरली.

मनसेसाठी देखील ‘मेळावा’ महत्त्वाचा 

शिवसेनेच्या कॅलेंडरमध्ये दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. इतकंच काय तर ज्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत नवा पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनाही अशीच पक्षाची ओळख बनवणारा ‘गुढीपाडवा मेळावा’ सुरु केला. तर दसरा मेळावा हा शिवसेनेचाच राहिला. एखाद्या पक्षाने सलग इतकी वर्ष न चुकता एका ठिकाणीच आणि ठराविक दिवशीच सभा घेणं ही एक विशेष बाब आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सेनेचा दसरा मेळावा एका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. पण कोरोना संकट असतानाही सेनेनं आपल्या परंपरेत खंड पडू दिला नाही.

मुंबई महापालिकेकडे लक्ष 

दरम्यान, कोरोना संकटापेक्षा मोठं संकट आता शिवसेनेवर आलंय कारण मूळ शिवसेना कुणाची असा प्रश्न उद्भवला आहे. शिवसेनेसाठी दसरा मेळाव्याचं इतकं महत्त्व आहे म्हणूनच पक्षावर दावा करणाऱ्या शिंदेंना सुद्धा हा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे. कारण यातून सुद्धा ‘आम्हीच मूळ शिवसेना’ हे दाखवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेसाठी कोणत्या बाजूने परवानगी द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी बीएमसीने आपल्या विधी विभागाकडून कायदेशीर दृष्टिकोन मागवला आहे. खरंतर एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा असणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्कात दसरा मेळावा नक्की कोण घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

पहा HW मराठीचा EXCLUSIVE रिपोर्ट 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत ?” चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल 

News Desk

छिंदम मारहाण प्रकरणी सेनेच्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

News Desk

“पोलिस म्हणजे मानलं तर देव नाहीतर दगड”, उदयनराजेंचं धक्कादायक विधान

News Desk