HW News Marathi
राजकारण

अयोध्या खटल्याचा मार्ग मोकळा, निवडणुकीच्या आधी होणार निर्णय 

नवी दिल्ली । मशिद हा इस्लामचा अविभाज्य घटक आहे किंवा नाही, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महत्वपूर्ण निकाल दिला.१९९४ च्या इस्माइल फारुकी खटल्याच्यावेळी मशिद इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. या निकालाला मुस्लिम संघटनांकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यासाठी तीन सदस्यीय विशेष खंडपीठाची स्थापना करण्यात आली होती. अयोध्येत राम मंदीर बांधले जाईल की नाही? याचा निर्णय २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लागणार आणि भाजपाला याचा मोठा फायदा होणार हे आज स्पष्ट झाले. अयोध्येच्या जमिनीचा वाद हा धार्मिक वाद आहे आणि हा खटला, घटना खंडपीठापुढे न्यावा या दोन्ही मागण्या आज सर्वोच्च न्यायालयाने साफ फेटाळून लावल्या. आता केवळ जमीन मालकीचा विवाद यादृष्टीने या खटल्याची सुनावणी २९ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी याचा निश्चित निर्णय येईल. या खटल्याच्या सुनावणीला विलंब लागेल, असे सर्व अडथळे दूर झाले आहेत.

आज सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टीस अशोक भूषण व जस्टीस अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने निर्णय देताना सांगितले की, हा खटला मोठ्या घटनापलिकडे वर्ग करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर या खटल्याला धार्मिक अंग नसून केवळ जमिनीच्या मालकीबाबत हा खटला आहे. १९९४ साली न्यायालयाने म्हटले होते की, नमाज कुठेही अदा करता येईल. त्यासाठी मशिदीची आवश्यकता नाही. मात्र न्यायालयाची ही केवळ टिप्पणी होती. खंडपीठाचे जस्टीस अब्दुल नजीर यांनी मात्र असहमती दर्शवत आपले म्हणणे नोंदवत म्हटले की, १९९४ सालच्या खटल्यात न्यायालयाने नमाजाबाबत जे म्हटले होते त्यानंतर हा खटला घटनापीठाकडे द्यावा, असे माझे मत आहे. मात्र दोन विरुद्ध एक या बहुमताने आज निर्णय जाहीर होऊन हा खटला तीन जस्टीसच्या खंडपीठापुढेच सुरू राहील आणि धार्मिक बाब पूर्णपणे बाजूला सारून केवळ जमिनीच्या मालकीबाबत युक्तीवाद मर्यादीत राहील, असे निश्चित झाले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे ३ ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. नवीन सरन्यायाधीशांची नेमणूक झाल्यावर नवे खंडपीठ तयार होईल आणि त्या खंडपीठापुढे २९ ऑक्टोबरपासून या खटल्याची सुनावणी केली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गौतम गंभीरविरोधात दोन मतदान कार्ड प्रकरणी गुन्हा दाखल, १ मे रोजी होणार सुनावणी

News Desk

काँग्रेसचा इतका दारुण पराभव झाला तरीही राहुल गांधींमध्ये सुधारणा झाली नाही !

News Desk

राष्ट्रवादीच्या करमाळ्याच्या रश्मी बागल-कोलते उद्या घड्याळ सोडून हातावर बांधणार शिवबंधन

News Desk