HW News Marathi
राजकारण

दीपक केसरकरांचे मुख्य प्रवक्ते पद ‘या’ कारणामुळे जाण्याची शक्यता

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपशी हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले आहे. यानंतर शिंदे गटाची बाजू ही मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून ते भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीका केली.

दरम्यान, केसरकरांनी शुक्रवारी (5 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन राणेंवर हल्ला बोल केला. यावेळी केसरकर म्हणाले.  सुशांत सिंह राजपूत यांच्या केसदरम्यान राणेंनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा आरोप केला होता. यावरून राणे आणि केसरकर यांच्या वादयुद्ध रंगल्याचे राज्यात दिसून येत आहे. यामुळे केसरकरांना राणेंसबोत घेतला पंगा महागात पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

यामुळे केसरकरांकडून शिंदे गटाच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी काढून घेण्याच येण्याची चर्चा सुरू आहे. शिंदे सरकार येऊन फक्त 1 महिना उलडून गेला आहे. यानंतर केसरकरांची तक्रार राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून फडणवीसांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली. यामुळे केसरकरांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केसरकरांनी राणेंवर नेमके काय आरोप केले

“आदित्य ठाकरेंबद्दल जे बोलले जाते. आणि त्या वस्तुस्थिती मध्ये जमिनीआसमानचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की, सुशांत सिंग प्रकरण जे महाराष्ट्रात घडले. त्यावेळा आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि ही बदनामी करण्यामध्ये सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्या पत्रकार परिषद घेतल्या त्याचा मोठा वाटा होता. आमच्यासारखे लोक जे ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करतात, ती सुद्धा यामुळे दुखावली गेली होती. आणि त्यामुळे भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी माझे जवळचे संबंध आहेत. मी त्या नेत्यांना विचारले होते की, तुम्ही तुमचा  प्लॅटफॉर्म अशा गोष्टींसाठी कसा वापरू शकता. त्यावेळी त्यांनी मला सांगितले आमच्या बहुतांश आमदारांचे अशा तरेच्या बदनामीला आमचा विरोध आहे.” असे केसरकर म्हणाले.

 

संबंधित बातम्या

“सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनामी करण्याचा राणेंचा प्रयत्न,” केसरकरांचा गंभीर आरोप

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज द्रौपदी मुर्मूंच्या राष्ट्रपतीपदाच्या विजयावर होणार शिक्कामोर्तब; देशाला मिळणार दुसरी महिला राष्ट्रपती

Aprna

अल्पसंख्यांकांच्या एकजुटीचा नेता पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री होऊ शकतो !

Gauri Tilekar

जिवंत हिंदू हेच बाळासाहेबांच्या विचारांचे दीपस्तंभ !

News Desk