HW News Marathi
राजकारण

चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव !

जालना | “यंदाच्या लोकसभेत झालेला चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव आहे”, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे हे आज (९ मे) जालना जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे, सतत ४ वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांना यंदा पत्करावा लागलेला हा पराभव नक्कीच शिवसेनेला अनपेक्षित आहे. खैरे ३१ वर्षांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांना पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

लोकसभेत झालेल्या आपल्या या पराभवाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच स्वतः चंद्रकांत खैरे यांनी देखील अत्यंत उद्विग्न अशी प्रतिक्रिया दिली आहे. “मी निवडणुकीपूर्वीच हार्टअटॅक येऊन मेलो का नाही”, असे भावनिक वक्तव्य खैरे यांनी केले आहे. औरंगाबादमध्ये पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात चंद्रकांत खैरे बोलत होते. “ज्यांना ज्यांना मी मोठं केलं त्यांनी माझ्याविरोधात काम केलं, याचं दुःख वाटत”, असेही चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे शिवसेनेत संघटनात्मक बदलाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निलेश राणेंच्या वर्तणुकीला वैतागून पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

News Desk

राहुल कलाटे चिंचवड पोटनिवडणूक लढवणार; ‘मविआ’च्या प्रयत्नांना अपयश

Aprna

वंचित बहुजन आघाडीचे बटण दाबले तरीही भाजपलाच मत ?

News Desk