HW Marathi
देश / विदेश राजकारण

पाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलेल्या समर्थनाचा आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी घरपूस समाचार घेतला आहे.  केजरीवाल यांनी म्हटले की, पाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही. ज्यांनी पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या कॅम्पवर आयएसआयला मोदींनीच हल्ला करू दिला. तसेच पाकिस्तानचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत, असे म्हणात मोदींवर निशाणा साधला.

अरविंद केजरीवाल पुढे असे देखील म्हणाले की, निवडणुकीपूर्वी भारतामध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला. या घटना निवडणुकीपूर्वी घडवल्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या नक्की काय शिजतेय? हे काळत नाही. निवडणुकीपूर्वी १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याबाबत केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काही दिवसांपूर्वी परदेशी पत्रकारांशी संवाद साधताना पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले होते. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली, तर भारतासोबत शांततेने चर्चा करण्याची चांगली संधी मिळेल. इमरान खान यांच्या विधानाचा उल्लेख करत केजरीवाल यांनी मोदींवर शंका उपस्थित केली.

 

Related posts

Tarun Sagar Died | जैन मुनी तरुण सागर यांचे दीर्घ आजाराने निधन

News Desk

पाकिस्तान सीमेवर वाढत आहे मुस्लिम लोकसंख्या !

News Desk

राजस्थान रामगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

News Desk