HW News Marathi
राजकारण

‘मविआ’ सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार! – अजित पवार

मुंबई | “महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे,” अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि 37 आमदारांनी बंड पुकारले आहे. शिवसेनेने बंड पुकारलेले आमदार सध्या गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. “शिवसेनेने जर महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असे वाटत असेल तर तुम्ही सर्वांनी 24 तासात मुंबईत परत या. आणि तुमची मागणी पक्षप्रमुखांसमोर मांडावी,” असे चर्चा करण्याचे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने बैठक बोलावली होती.

अजित पवार म्हणाले, “बैठकीला सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित होते. काही व्हीसीवरुन तर काही प्रत्यक्ष हजर होते.  आता सध्या महाराष्ट्रमध्ये जो काही ही राजकीय  परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये माझ्यानंतर प्रांत अध्यक्ष अधिकारवाडी सांगितील, पण महाविकास आघाडीच्या सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना पूर्णपणे पाठिंबा देऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत हे सरकार कसे टीकेल याबद्दल प्रयत्न करत राहणार आहे. प्रयत्न करणार आहेत, अशा पद्धतीने आम्ही काम करत आहे.”

चॅनेलला जाऊन बोलण्यापेक्षा आपण एकत्र येतो, तेव्हा चर्चेतून गैरसमज दूर झाले असते

“गेल्या अडीच वर्षात कोणत्याही निधीला काटछाट केलेली नाही. जो अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आहोता. तो आमदार निधी, विकास निधी हा सगळा दिला आहे. पण त्यांनी तसे का वक्तव्य केले मला माहिती नाही. परंतु, मी कधी दुजा भाव केलेला नाही. उलट मी सगळ्यांना विकास कामामध्ये मदत करण्याची भूमिका हीच असते. ही आपण पाहिलेली आहे. मी अनेकदा 9 वाजताच ऑफिसला येवू बसतो. मी मिटिंग किंवा चर्चेच्या माध्यमातून जेवढे प्रश्न सोडविता येतील. तेवढे प्रश्न सोडवण्याचे  काम मी करत असतो. वास्तविक ता असे चॅनेलला जाऊन बोलण्यापेक्षा ज्यावेळी आमची एकत्रपणे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि शिवसेनेचे काही प्रमुख आम्ही एकत्रपणे चर्चा करत असतो. त्यावेळी असागत असतो. त्यावेळे काही तिथल्या तिथे गैरसमज दूर झाले असते. आशा काळामध्ये प्रत्येकाने आमच्या तिघांची आघाडी आहे. तिघांनी पक्ष ही कशी टीकेल आणि ही आताची परिस्थिती निटपणे कशी आपल्याला हाताळता येईल. याच बद्दलचा प्रयत्न केला गेला,” असे अजित पवार म्हणाले.

 

Related posts

मुस्लिम समाजाने आता वाघ व्हावे !

News Desk

मध्य प्रदेशसह राजस्थानच्या शपथविधी सोहळ्यात भाजप नेत्यांची हजेरी

News Desk

Live Update : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल

News Desk