HW News Marathi
राजकारण

विधान परिषदेच्या निवडणूकीत चमत्कार कसा घडेल हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहिलच ना! – अजित पवार

मुंबई | विधानपरिषद निवडणूकीत चमत्कार होईल की नाही आणि चमत्कार कसा घडेल हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहिलच ना अशा शब्दात विधानपरिषदेच्या निवडणूकीतील रणनीतीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (18 जून) माध्यमांशी बोलताना भाष्य केले. उस्मानाबाद जिल्हयातील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आमचा एवढ्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता आम्हाला थोडीशी मते तरी मिळतील ना असा टोलाही अजित पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला. विधानपरिषद निवडणूकीत आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्न करत आहोत. सेनेकडे दोन निवडून आणू शकतात एवढी मते आहेत. आमच्या दोघांना न्यायालयाने परवानगी दिली नाही त्यामुळे आमच्याकडे ५१ आमदारांची संख्या आहे. एखादं मत राज्यसभेसारखं बाद ठरवलं जाऊ शकतं त्यामुळे ती खबरदारी घेतली जात आहे. कोटा जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सेनेचे दोन्ही उमेदवार व्यवस्थित निवडून येतील. शिवसेनेने अपक्ष आमदारांना मंत्री केले आहेत ते सेनेकडेच जातील. एक – दोन आकडे आमच्या उमेदवारांना घेतले तर तीन – चार आकडे कुणाला द्यायचे हे ठरायचे आहे. महाविकास आघाडीत एकजूट असून अपक्षांना आम्ही फोन केला होता त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती. ज्यांना फोन केला होता त्यांनी मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे आम्ही मतदान करु असे सांगितले आहे असेही अजित पवार म्हणाले.

केंद्रीय यंत्रणांकडून कॉल केले जात आहेत याबद्दल आमच्या आमदारांनी आम्हाला अद्याप सांगितले नाही असेही अजित पवार यांनी कॉंग्रेसच्या आमदारांना करण्यात आलेल्या कॉलवर बोलताना स्पष्टीकरण दिले. आमदार निवडून देत असताना आपापला कोटा आहे. परंतु आम्हाला संख्या कमी पडतेय त्याचे नियोजन सुरू आहे. बविआच्या नेत्यांना सर्वचजण जाऊन भेटले आहेत मात्र स्वतंत्र विचाराचे लोक आहेत त्यांना कोण भेटत असतील आणि मतदान करा सांगत असतील तर त्यात चुकीचे काही नाही. आता मतदानाला आमदारांची संख्या २८४ राहिली तर २६ चा कोटा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदसदविवेकबुद्धीचे स्मरण करून अधिकृत उमेदवाराला मत मिळेल व विरोधकांनीही सदसदविवेकबुद्धीचे स्मरण करत आम्हालाच मत द्यावे असेही अजित पवार म्हणाले.

 

‘अग्निपथ’ वरुन अनेक राज्यात तरुण रस्त्यावर उतरून जाळपोळ करत आहेत. ही योजना जाहीर करताना केंद्राने वयाचा निर्णय घेतला नव्हता मात्र तरुणांचा संताप लक्षात घेता वयाच्या अटीमध्ये केंद्रसरकारने बदल केला आहे हा निर्णय केंद्रसरकारने अगोदरच घ्यायला हवा होता म्हणजे हा रोष वाढला नसता असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. दरम्यान तरुणांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करु नये. कोरोना काळात अनेक रोजगार गेले आहेत त्यामुळे तरुणांच्या भावना आम्ही समजून आहोत असेही अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

“विधान परिषदेत मविआची विकेट पडेल; भाजपची नाही”, चंद्रकांत पाटलांचा दावा
“विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Related posts

“राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला”, अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna

भाजप आणि राष्ट्रवादीला आणखी एक धक्का

News Desk

महाआघाडीत पहिली संयुक्त प्रचार सभा २० फेब्रुवारी | अशोक चव्हाण

News Desk