HW News Marathi
राजकारण

“महाविकास आघाडी सरकार OBC आरक्षणाबाबत गंभीर नव्हते,” देवेंद्र फडणवीसांची टीका

मुंबई | “महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नव्हते. तर सरकार हे वेकाढू पण करत आहे,” असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. बांठिया आयोगानुसार निवडणुकीत ओबीसीच्या राजकीर आरक्षण मिळणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज (20 जुलै) सुनावणीत दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये श्रेयवादावरून वाद सुरू झालेला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास सरकारवर टीका केली

फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर न्यायालयाने आदेश दिला की, ट्रीपल टेस्ट पूर्ण करा, इम्पेरिकल डेटा गोळा करा. मात्र, महाविकास आघाडी सरकारने 15 महिने उलटून गेल्यानंतर ओबीसी आयोग गठीत केला नाही. उलट केंद्र सरकारकडे बोट दाखवले होते. केंद्राच्या जनगणनेच्या आधारावर ओबीसींचे आरक्षण दिले नाही. महाविकास आघाडी हे ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नाही. तर सरकार हे वेकाढू पण करत आहे, असे न्यायालयाने म्हटले होते,” असे ते म्हणाले.

“शिंदे सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षणासंदर्भात मी पहिली बैठक घेतली. आणि बांठिया आयोगात काय करत आहे, याचा आढावा घेतला. आणि 12 जुलै रोजी अहवाल दाखल केलाच पाहिजे, या निर्णयावर आमचे सरकार ठाम होते. यानंतर न्यायालयाने आजची तारीख दिल्यानंतर सरकारी वकिलांनी आज युक्तीवाद केला. आणि न्यायालयाने आमच्या सरकारने दिलेला अहवाल स्वीकारला,” असे फडणवीसांनी सांगितले.

न्यायालयाने काय म्हटले

राज्यात 92 महानगरपालिका आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे रखडल्या होत्या. यानंतर न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे बांठिया आयोगाच्या अहवालानुसार ओबीसी आरक्षण मिळणार आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्कांपर्यंत आरक्षण मिळणार आहे, बांठिया आयोगाने तशी शिफारस केली आहे. बांठिया आयोगा नुसार, ज्या ज्या ठिकाणी ओबीसीची संख्या जास्त आहे. त्या त्या ठिकाणी ओबीसींना आरक्षण मिळणार आहे.

 

 

 

Related posts

क्रिकेट विश्वाचा पहिला सम्राट हरपला | आठवले

News Desk

“दसरा मेळावा घ्यायचा अधिकार हा आमचा”, शिंदे गटाचा दावा

Aprna

RamMandir : …म्हणून आज रात्रीच सर्व शिवसैनिक महाराष्ट्रात परतणार

News Desk