Site icon HW News Marathi

“दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SITमार्फत चौकशी होणार; उपमुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा

मुंबई | “दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे”, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केली आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज (22 डिसेंबर) चौथा दिवस असून दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून सत्तधाऱ्यांनी आक्रमक पवित्रात घेतला. या प्रकरणावरून सभागृहात गदारोळ सुरू झाला होता. या पार्श्वभूमीवर सभागृह 15 मिनिटाने तहकबू करण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबई पोलिसांकडे दिशा सालियन मृत्यूची केस सुरू आहे. यासंदर्भात जी मागणी आहे, जे काही पुरावे, ज्यांच्याकडे असतील त्यांनी ते त्यावे. या प्रकरणात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल. ते न्यूज रिपोर्टच्या आधारावर बोलली आहे. मुळात दिशा सालियन केस ही कधीच सीबीआयकडे गेलेली नव्हती. सुशांत सिंह राजपूतची केस सीबीआकडे गेली आहे. सीबीआयला ज्यावेळी विचारले, ते म्हणाले की, आमच्याकडे दिशा सालियनची केस नाही. यामुळे आम्ही त्यांचा तपास करत नाही. यामुळे सालियन प्रकरणात सीबीआयचा कुठलाही रिपोर्ट नाही. सीबीआयकडे सुशांत सिंह राजपूतची केस आहे. यासंदर्भात सीबीआयने वैद्यकीय रिपोर्ट दाखविलेले आहे. मी आपल्यामार्फत सभागृहात विरोधी पक्षात बसलेल्या लोकांना सुद्धा आश्वस्त करू इच्छतो. कोणताही राजकीय अभिवेश न ठेवता. यासंदर्भात जे काही पुरावे, आता मांडले जात आहेत. या पुराव्यांच्या आधारे कोणलाही टार्गेट करण्याचा विषय यात होणार नाही. अतिशय निष्पक्षपणे नवीन पुरावे काही आलेले असतील. तर त्यासंदर्भातील चौकशी होईल.”

या प्रकरणी विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले, “दिशा सालियन हयात नसताना. या प्रकरणी बोलून तिला आणखी बदनाम करायचे नाही. दिशा सालियनच्या आई-वडिलांनी हात जोडून विनंती केली आहे. जर दिशा सालियनची चौकशी करायची असेल तर पुजा चव्हाणची देखील चौकशी करायला पाहिजे. जर जौकशी करयाची असेल तर सर्वच चौकशी करता येईल. यात फक्त राजकारण करू नका”

 

 

Exit mobile version