HW News Marathi
राजकारण

बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड; उपमुख्यमंत्र्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन

मुंबई | पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिके (Kannada Rakshana Vedike )या संघटनेने तोडफोड केला आहे. या संघटनेने बेळगावच्या (Belgaum) हिरेबागेवाडी टोल नाक्यावर गाड्यांची तोडफोड करत आंदोलन केला आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन करून नाराजी व्यक्त केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

फडणवीस फोनवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलताना म्हणाले, “बेळगाव येथील हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनेबद्दल झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत निषेद नोंदविला आहे. या घटनेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. तसेच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिले जाईल”, अशी माहिती फडणवीसांना दिली आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना फोन म्हणाले, “बेळगाव प्रकरणात झालेल्या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कारवाईवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

बेळगावच्या हिरेबागेवाडी टोल नाक्यावर गाड्यांची तोडफोड प्रकरणी राज्यातील विरोधी पक्षांनी निषेध केला आहे. राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत म्हणाले, “या प्रकरणाची कर्नाटकच्या सरकारने गंभीर दखल घ्यावी”, अशी मागणी केली. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, “नपुंसक पद्धतीने राज्या चालवले जात असून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद म्हणण्याचा हक्क भाजपने कायमचा गमावला आहे. राज्य सरकार सतत नपुंसकत्व सिद्ध करत आहेत.”

 

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील गाड्यांवर कर्नाटकच्या ‘या’ संघटनांकडून तोडफोड; सीमावाद चिघळण्याची शक्यता

 

Related posts

मध्य प्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये कोण ?

News Desk

नागपूरात राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; बंद दाराआड चर्चा

Aprna

“…लवकरच कळेल किती साखर खाल्ली”, मोहित कंबोजांनी ट्वीट करत रोहित पवारांवर साधला निशाणा

Aprna