Site icon HW News Marathi

उपमुख्यमंत्री दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी; कोणाला उमेदवारी मिळणार?

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीवरून थेट पुण्यात दाखल झाले आहे. उपमुख्यमंत्री हे पिंपरी चिंचवडचे (Chinchwad bypoll) दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या घरी अचानक पोहोचले. उपमुख्यमंत्र्यांच्या लक्ष्मण जगताप यांच्या घरी अनपेक्षित भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दीर्घ आजाराने लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. लक्ष्मण जगताप यांच्या अचानक जाण्याने पिंपरी चिंचवडची जागा रक्त झाली असून या पिंपरी चिंचवड विधानसभाची पोटनिवडणूक होणार आहेत. यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे बंधू शंकर जगताप या दोन्ही पैकी कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

दरम्यान, पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात इतर ही इच्छुक उमेदवारी आहेत. या सर्वांना साभाळून भाजपला उमेदवारी द्याची आहे. भाजपला पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक ही बिनविरोध करायची आहे. तसेच भाजपला पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी द्यावी लागणार आहे. यामुळे भाजपकडून लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचे मनधरणी करावी लागणार आहे.

 

 

Exit mobile version