HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री !

नांदेड | देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री, अशा खोचक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये आज (१२ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर घाणाघाती आरोप केले. नांदेडच्या प्रचार करण्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलताना मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

मुख्यमंत्री पाणी प्रश्नावर काहीच करत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पण तरीही राज्यातले पाणी गुजरातला वळवायचे काम सुरू आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी मात्र हाताची घडी घातली आहे, कारण बसवलेला मुख्यमंत्री काय बोलणार?, अशा शब्दांमध्ये राज यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

पुढे राज ठाकरे असे देखील म्हणाले की, राज्यातील २४ हजार गावे, १५१ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मग सरकारने पाण्यासाठी काय योजना केल्या? राज्यात १ लाख २० हजार विहिरी बांधल्या असा दावा मुख्यमंत्री करतात. कुठे आहेत या विहिरी? असा सवाल राज यांनी उपस्थित केले. राज्यातील परिस्थिती भीषण असून पाण्याची समस्या गंभीर आहे. ग्रामीण भागात दुष्काळ असल्यामुळे राज्यातील युवकांचे लोंढेच्या लोंढे शहरात येत नाहीत. राज्यातील युवकांना नोकऱ्या नाहीत. मग मोदींचे अच्छेचे दाखविलेले स्वप्नांचे काय झाले? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.

 

 

Related posts

स्मृती इराणी विरोधात हडपसर पोलिसांत तक्रार

News Desk

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे | नारायण राणे

News Desk

ते राजा मी सरदार

Ramdas Pandewad