HW News Marathi
राजकारण

मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे! – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई। “मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे”, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)  यांनी केले आहे. बावनकुळेंच्या वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री पद जाणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ” आपली जबाबदारी आहे, पुन्हा एकदा २०१४-१९ चा काळ या महाराष्ट्रात आला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे.या करिता आपण सर्व समाजाच्या लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे ताकद लावून त्यांनी पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या सर्वोच्च मानाच्या पदापर्यंत नेहले पाहिजे. किमान मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.”
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. यामुळे बावनकुळेंच्या वक्तव्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पडणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरेंच्या सभेपुर्वीच शिवसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

News Desk

काँग्रेसचा पराभव झाला म्हणजे संपूर्ण देश हरला हा कोणता तर्क आहे ?

News Desk

भाजपला बारामतीत विजय मिळाल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन !

News Desk