HW Marathi
क्रीडा राजकारण

धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार ?

नवी दिल्ली | भारतीय टीममधील माजी फलंदाज गौतम गंभीरने भाजपत प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवून खासदार म्हणून लोकसभेत नेतृत्त्व करत आहेत. गंभीर पाठोपाठ आता भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेट विश्वातून लवकरच निवृत्ती घेऊन राजकीय मैदानात फलंदाजी करणार असल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री संजय पावसान यांनी केला आहे. याबाबत पासवान यांनी धोनीशी अनेकदा चर्चा झाली असल्याचे सांगीतले आहे.

दरम्यान, पक्षाच्या संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी धोनीची भेट घेतली होती. धोनीसोबतच इतर सेलिब्रिटींवरही क्रीडा, सिनेमा, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना भाजपात आणणे आपले लक्ष्य असल्याचे  पासवान यांनी सांगितले. मात्र, धोनीला राजकारणात येण्यापूर्वी निवृत्ती जाहीर करावी लागेल. या त्यानंतरच त्याला राजकारणात येता येईल.  परंतु राजकारणात येण्यापूर्वी धोंनीने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावी लागेल असे देखील पवासवान यांनी म्हटले आहे.

 

Related posts

#Article370Abolished : काश्मीरच्या निर्णयावर पाकिस्तानचा जळफळाट

News Desk

आधी भाजपने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यांसाठी केलेल्या खर्चाचा तपशील द्यावा !

News Desk

भाजपश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत कमलनाथ सरकार पाडू !

News Desk