HW News Marathi
राजकारण

भाजपला मतदान करू नका, बॉलिवूडमधील ६०० दिग्गज कलाकारांचे आवाहन

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात मतदान करण्याचे आवाहन बॉलिवूडमधील ६०० दिग्गज कलाकारांनी केले आहे. या कलाकारांच्या यादी नसरुद्दीन शाह यांच्यासह दिग्दर्शक अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांचा समावेश आहे. ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

कलाकारांनी यासंदर्भात एक पत्रकही जारी केले आहे. या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शहा, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे, अुनराग कश्यप, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांच्या स्वाक्षऱ्या पाहायला मिळत आहेत. खरे तर हे पत्र एक दोन, नव्हे तर १२ भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. आर्टिस्ट युनायटेड इंडियाच्या संकेतस्थळावर हे पत्र अपलोड करण्यात आलं आहे.

भाजप सरकार आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळचेपी व्हायला लागली, असा आरोप या सर्वांनी केलाय. शिवाय समाजात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणे, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आणि सेन्सॉरशिपच्या नावाखाली कलाकारांची होणारी गळचेपी ही या विरोधाची मुख्य कारणे आहेत. सरकारच्या अघोरी धोरणाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा ठरत आहे. यामुळे सर्व कलाकारांनी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena Dasara Melava 2018 | मी टू मी टू नका करु, कानाखाली जाळ काढा !

News Desk

माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केली विखेंची पाठराखण

Gauri Tilekar

कुटुंबीयांच्या आक्रोशामुळे तरी सरकार जागे होणार आहे का ?

News Desk