HW News Marathi
राजकारण

पद्मावत सिनेमा पाहण्यासाठी वेळ आणि पैसा वाया घालवू नका – ओवीसी

हैदराबाद – ‘अल्लाने लोकांना वेळ असे सिनेमा पाहण्यासाठी दिला नाही. तर सिनेमा पाहून तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवू नका’ असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. आंध्र प्रदेश मधील एका सभेत बोलताना त्यांनी हे विधान केले होते. पद्मावत हा सिनेमा २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. पद्मावत सिनेमाचा वाद काही संपण्याचे नाव घेत नाही. पद्मावत हा सिनेमा २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.

सेन्सॉर बोर्डाने पद्मावत सिनेमाला हिरवा कंदील देऊन ही चार राज्यात या सिनेमावर बंदी घातली होती. या बंदी विरोधात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने सिनेमावर लावण्यात आलेली बंदी उटवली असून देशातील सर्व राज्यात हा सिनेमा रिलीज करण्यात योणार आहे.

सिनेमाला मंजुरी देण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने इतिहासकारांची विशेष समिती नेमण्यात आली होती. बोर्डाने काही दृश्यांना कात्री लावल्यानंतर सिनेमाला परवागी देण्यात आली. सिनेमाला असलेला विरोध कमी होताना दिसत नाही. हा सिनेमा संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शन केले असून दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहीद कपूर यांची मुख्य भूमिका आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना-वंचित युतीचा फायदा कुणाला? प्रबोधनकार ठाकरेंपासून ‘भीमशक्ती-शिवशक्ती’ प्रयोग

Manasi Devkar

जर पंतप्रधान तुमचा होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद आम्हाला द्या !

News Desk

जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंगाच्या आरोपावर अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका, म्हणाले…

Aprna