Site icon HW News Marathi

सुधीर तांबेंनी अर्ज न भरल्यावर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार  सुधीर तांबे ( Sudhir Tambe)) यांना उमेदवारी दिली होती. परंतु, सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म आला होता. तरी देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. यासंदर्भात सुधीर तांबे यांनी पक्षासोबत कोणतीही सल्लामसलत न करता परस्पर अर्ज भरला नाही. यामुळे काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबेर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज न भरल्याची बातमी माध्यमातून मिळाल्याची पहिली प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.

 

सुधीर तांबे प्रकरणात बोलताना नाना पटोले म्हणाले, “मी मीडियाच्या माध्यमातून बातमी बघत होतो. मी डॉ. सुधीर तांबे यांचे मतही वक्तव्य तुमच्या माध्यमातून ऐकत होतो. मी या सगळ्या गोष्टींची माहिती घेतो. नेमके काय झाले, त्यांची कारणे काय? या सगळ्या गोष्टी आल्यानंतर मी त्यावर पक्षपातळीवर चर्चा करून, निश्चितपणे जे काही झाले. या प्रकरणाचे स्पष्टीकरण आम्ही तुम्हाला देऊ. सत्यजीत तांबे हे अपक्ष आहे. त्यांनी काय करावे, तो त्यांचा प्रश्न आहे. आमच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुधीर तांबे होते. त्यामुळे सुधीर तांबे यांनी का उमेदवारी अर्ज भरला नाही. यासंदर्भाची सगळी माहिती घेऊन यावर प्रतिक्रया देऊ.”

 

उमेदवरी अर्ज न भरल्यावर सुधी तांबेंची प्रतिक्रिया देत म्हणाले…

उमेदवारी अर्ज न भरल्यानंतर सुधी तांबेंनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “सत्यजीत तांबेसारखे राज्यात जे तरुण मुले नेतृत्व करत आहेत. आणि या तरुणांना वेगवेगळ्या विषयाचे संखोल ज्ञान आहे. यामुळे निवडणुकीत हे नेतृत्व द्यावे, असे आमचे ठरले आहे. यामुळेच सत्यजीत तांबे यांनी अर्ज भरला आहे.”

Exit mobile version