Site icon HW News Marathi

द्रौपदी मुर्मी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, आज सरन्यायाधीश देणार गोपनीयतेची शपथ

मुंबई | देशाच्या 15 व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहे.  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा द्रौपदी मुर्मू यांना  गोपनीयतेची शपथ देणार आहे. राष्ट्रपती मुर्मू यांच्या शपथ विधीचा कार्यक्रम संसदेतील  सेंट्रल हॉलमध्ये आज (25 जुलै) सकाळी 10.15 वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाईल.

दरम्यान, नुकत्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत मुर्मू यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला आहे. तर या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या आणि देशातील दुसऱ्या महिला राष्ट्रपती विराजमान होणाऱ्या महिला ठरल्या आहेत.

द्रौपदी मुर्मू यांचा अल्प परिचय

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील असून द्रौपदी मुर्मू 1997 मध्ये रायनगरपूर नगर पंचायतमध्ये 1997 साली नगरसेवक झाल्या होत्या. 2000 आणि 2009 मध्ये भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आल्या. भाजप सरकारमध्ये द्रौपदी मुर्मू यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळाला होता. 2015 मध्ये द्रौपदी मुर्मू यांना झारखंडच्या पहिल्या राज्यपाल झाल्या होत्या.

 

संबंधित बातम्या

द्रौपदी मुर्मू पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती पदी विराजमान

 

Exit mobile version