Site icon HW News Marathi

आज द्रौपदी मुर्मूंच्या राष्ट्रपतीपदाच्या विजयावर होणार शिक्कामोर्तब; देशाला मिळणार दुसरी महिला राष्ट्रपती

मुंबई | देशाच्या राष्ट्रपती पदासाठी 18 जुलै रोजी मतदान पार पडले होते. या 15 वे राष्ट्रपती पदासाठी (21 जुलै) सकाळी 11 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. ही मतमोजणी संसद भवनात होणार आहे. एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे. मुर्मूंच्या विजयाने पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती पदी विराजमान होणार आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत यूपीएच्या वतीने माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा हे देखील रिंगणात आहेत. पंरतु, मुर्मू यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणे शिल्लक असल्याचे बोलले जाते.

देशाला 15 वर्षापूर्वी आजच्या दिवशी पहिली महिला राष्ट्रपती मिळाली होती. देशाला 21 जुलै 2007 रोजी प्रतिभा पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. प्रतिभा पाटील यांनी 25 जुलै 2007 महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. प्रतिभा पाटील या 12 व्या राष्ट्रपती होत्या. प्रतिभा पाटील यांचा 2007 ते 2012 या कालावधीत देशाच्या राष्ट्रपती पदी विराजमान होत्या.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लोकसभेतील ५४३ आणि राज्यसभेतील २३३ या दोन्ही सभागृहातील एकूण ४८०९ खासदार मतदान केले आहे. यासाठी संसद भवनात ६ बूथ मतदानासाठी उभारण्यात आले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांचे मूल्य १० लाख, ८६ हजार, ४३१ एवढे आहे. दोन्ही सभागृहातील खासदारांचे प्रत्येक मताचे मूल्य ७०० एवढे होते. त्यामुळे खासदारांच्या एकूण मताचे मूल्य ५ लाख ४३ हजार २०० एवढे आहे. दरम्यान, एनडीएच्या उमदेवार द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत 61 टक्क्यांपेक्षा जास्त लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे.
संबंधित बातम्या

राष्ट्रपतीपदासाठी आज मतदानाला सुरुवात; द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात कोण मारणार बाजी

 

 

 

Exit mobile version