HW Marathi
देश / विदेश राजकारण

सनी देओलची खासदारकी येणार धोक्यात ?

नवी दिल्ली | अभिनेता आणि गुरुदासपूरचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार सनी देओल लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी अतिरिक्त खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी देओलला निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे देओलची खासदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सनी देओल यांना भाजपने पंजाबमधील गुरुदासपूर येथील तिकीटावर निवडणूक लढविली आणि जिंकून आली आहे. निवडणूक आयोगाने प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आखून दिली होती.  देओल यांनी प्रचारासाठी ८६ लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार आल्या आहेत. यानंतर निवडणूक आयोग देओल यांच्या खर्चाचा हिशेबाची तपासणी केल्यानंतर या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले. यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related posts

फ्रेंडशीप डे का ? साजरा केला जातो

अपर्णा गोतपागर

आपचे २० आमदार राष्ट्रपतीकडून अपत्रा

Ramdas Pandewad

मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय

News Desk