HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

डोंबिवलीत पाण्यावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये मारहाण

मुंबई | पाण्यावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये मारहाण झाल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांची नगरसेविका आशालता बाबर यांना मारहाण केली आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयाबाहेरच हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.

नांदिवली मिनल पार्क या प्रभागाच्या नगरसेविका असलेल्या बाबर या पाणीसमस्या असलेल्या रविकिरण सोसायटीत जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. त्याला यश न आल्याने लोकवर्गणीतून सोसायटीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. अखेर या सोसायटीला पाण्याचे एक कनेक्शन देण्याचे ठरले. मात्र त्याला म्हात्रे यांनी हरकत घेतली. रविकिरण सोसायटीला पाणीकनेक्शन दिल्यास म्हात्रे यांच्या प्रभागातील पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होईल, असा म्हात्रे यांचा आक्षेप होता.

म्हात्रे यांनी घेतलेल्या हरकतीचा विषय बाबर यांनी पक्षनेत्यांकडे मांडला होता. मात्र, त्यावर तोडगा न निघाल्याने त्यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे धाव घेतली. बाबर यांचे म्हणणे ऐकल्यानंतर याबाबत शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयात बैठक ठेवली होती.

 

 

 

Related posts

शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर हल्ला

अपर्णा गोतपागर

#MarathaReservation : उद्धव ठाकरेंमुळेच मराठा आंदोलकांचे उपोषण मागे ?

News Desk

बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk