Site icon HW News Marathi

शिंदे-ठाकरे गटामध्ये झालेल्या ‘त्या’ राड्यात सरवणकरांच्या बंदुकीतून गोळी सुटली; अहवालातून स्पष्ट

मुंबई | शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्या बंदुकीतून गोळी सुटल्याची धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे. गणेश विसर्जनसाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यक्रर्त्यांमध्ये राडा झाला होता. यावेळी सदा सरवणकरांनी त्यांच्या बंदुकीतून गोळी झाल्याचा आरोप केला होता. हा संपूर्ण प्रकार दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता. यानंतर बॅलेस्टिक तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालात सरवणकरांच्या बंदुकीतून गोळी सुटली आहे. यामुळे सरवणकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शकता वर्तवली जात आहे.

 

यासंदर्भात दादर पोलिसांत दोन्ही गटाविरोधात 15 स्पटेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. दादर पोलिसांनी सरवणकरांवर आर्म्स अॅक्ट गुन्हा दाखल होता. पोलिसांनी सरवकरणांची बंदुक जप्त केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवी येथे ठाकरे आणि शिंदे गटाचे कर्यकर्त्यांमध्ये राडा झाला हातो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यामुळे दोन्ही गटामधील संघर्ष टळला होता. परंतु, विसर्जनाच्या दिवशी पुन्हा एकदा सरवणकरांच्या समर्थकांनी शिवसैनिकांमध्ये शाब्दिक वादविवाद झाला होता. यानंतर शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना सरवणकरांनी बंदुकीचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर पोलिसांनी सरवणकरांसह समर्थकांवर गुन्हा दाखल केला होता.

 

नेमके काय आहे प्रकरण

शिवसेनेकडून गणपती विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्तांचे स्वागतासाठी मंच उभारण्यात आला होता. पण, शिवसेनेच्या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील मंच उभार केला होता. या मंचावरून सरवणकरांचे चिरंजीव समाधान सरवणकरांनी म्याव म्याव म्हणत शिवसेनेचे नेत्यांना चिडविले होते. यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. या शाब्दिक चकमकीचे रुपांतर भांडणात झाले. या प्रकरणामुळे दादर परिसरातील तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. या प्रकरणावर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर काहीसा कमी झाला होता. शिंदे गटाच्या लोकांना सत्तेचा माज आला आहे. शिवसैनिक सगळे हे सहन करायचे का?, आमच्या शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांना गोळीबारातून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे.

या प्रकरणी दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले पाच जणांना अटक केली आहे. यात शिवसेनेचे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे. शिंदे गटाचे संतोष तेलवणे यांना मारहाण झाली असून त्यांनी फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेकडून सुनील शिंदे यांनी सदा सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहेत.

Exit mobile version