HW News Marathi
राजकारण

नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ED च्या ताब्यात

मुंबई | पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl case)  शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीने राऊतांची 9 तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले आहे.  राऊतांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानी आज (31 जुलै) सकाळी 7 वाजता ईडी दाखल होती . राऊतांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक मोठे संख्येने हजर आहेत. राऊतांच्या समर्थनार्थ शिवसैनिक घोषणाबाजी करत आहेत.  राऊतांच्या घराबाहेर मोठा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलातील बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ईडीने राऊतांच्या निवसस्थानी कागदपत्रे आणि दस्ताऐवज तपास सुरू केला. ईडीने राऊतांच्या भांडूप येथील निवसस्थानासह दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटवरही झाडाझडती सुरू केली आहे. तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेर देखील सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ईडीने राऊतांना पुराव्यानंतर ताब्यात घेतले आहे. राऊतांची पुढील चौकशीही ईडी कार्यालयात होणार आहे. राऊतांवर कायदेशीर प्रक्रिया उद्या (1 ऑगस्ट) पार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

नेमके काय आहे प्रकरण

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या

“बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय…,” ED च्या कारवाईवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत यांच्या निवासस्थानी ED चे पथक दाखल; ‘या’ प्रकरणी अटक होणार?
माफीय संजय राऊतला आता हिशोब द्यावा लागणार! – किरीट सोमय्या
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंनी महापालिकेवरील मोर्चा पुढे ढकलला

swarit

आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला आव्हान

News Desk

मोदी-शहा क्लीन चिट प्रकरण | अशोक लवासांचा बैठकींवर बहिष्कार

News Desk