Site icon HW News Marathi

हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरमधील घर आणि साखर कारखान्यावर EDचा छापा; हे आहे संपूर्ण प्रकरण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर ईडीने छापे मारले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील कागलमधील आज (11 जानेवारी) सकाळी 6 वाजता ईडीने घरावर आणि पुणे येथील कार्यालयांवर छापे मारी केली आहे. हसन मुश्रीफ यांच्या अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी ईडीने छापेमारी केली आहे.

ईडीने हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहारातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर छापेमारी केली आहे. हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैन्यात करण्यात आला आहे.  आयकर विभागाने  2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील कागल घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी केली होती.

नेमके काय आहे प्रकरण

गेल्या काही महिन्यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी 2020 हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. कोणत्याही पारदर्शक व्यवहार न करता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेला चालवण्यासाठी दिला होता. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरी देखील कंपनीला कंत्रास कसे दिले?, या कंपनीचा मालक हा हसन मुश्रीफांचा जावई असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

 

 

 

Exit mobile version