Site icon HW News Marathi

नाना पटोलेंसह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना ‘या’ कारणामुळे पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई | नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची सक्तवसुली संचालनायकडून (ED) चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेस नेते आणि कार्यक्रर्त्यांचे आज (26 जुलै) आंदोलन केले होते. महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole), काँग्रेस मुंबई अध्यक्ष भाई जगताप, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड आदी दिग्गज नेते आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्व नेत्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

दरम्यान, मुंबईमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यात नाना पटोले, भाई जगताप, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड या सर्वांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलन करताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी “जब जब मोदी डरता है, पोलीस को आगे करता है” अशा घोषणाबाजी करत होते.

याआधी सोनिया गांधी गुरुवारी (२१ जुलै) ईडीने त्यांची दोन तास चौकशी केली होती. तेव्हा सुद्धा देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी आंदोलन केले होते. यानंतर ईडीने सोनिया गांधी यांना २५ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावला होता. तेव्हा सोनिया गांधी या २५ जुलै ऐवजी २६ जुलै रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालय हजर राहतील, असे सांगण्यात आले.

नेमके काय आहे प्रकरण

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र पंडित सुरू केले होते. एकेकाळी हे काँग्रेसचे मुखपत्र मानले जात होते. परंतु, काही काळातनंतर ‘नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र बंद पडले. यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी २०१२ मध्ये ‘यंग इंडिया’ या वर्तमानपत्राचे हक्क विकत घेतले. या वर्तमानपत्राच्या माध्यमातून काँग्रेस जवळपासू १६०० कोटींची संपत्तीही कमी किंमतीत घेतल्याचा आरोप भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला गेला होता. या प्रकरणी २०१५ मध्ये ईडीने तपास केला होता. हे संपूर्ण प्रकरण गेल्या ७ वर्षापासून न्यायालयात आहेत.

संबंधित बातम्या

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आज पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार

 

Exit mobile version