Site icon HW News Marathi

“एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांनी कधीही बेळगावला भेट दिली नाही”, संजय राऊतांचा टोला

मुंबई | “एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांनी कधीही बेळगावाल भेट दिली नाही”, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना लगावला आहे. राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीला गेले आहे.  यावेळी राऊतांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत राज्य सरकारने समोवारी (21 नोव्हेंबर) बैठक घेतली होती. या बैठकीत न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. यावरून राऊतांनी आज (22 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले, ” या बैठकीत सीमा भागातील राज्य सरकारमधील एकही मंत्री बेळगावात उपस्थित नव्हता. राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मविआ सरकारच्या काळात बेळगाव प्रश्नाच्या समितीमध्ये होते. परंतु, एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील हे कधीही बेळगावला भेट दिलेली नाही. या सरकारचे एकही मंत्री बेळगावमध्ये गेलेले नाही. यंदाच्या वर्षी झालेल्या मराठी भाषकांच्या आंदोलनातही त्यांनी राज्यातून सरकारचा एकही मंत्री, नेता सहभागी झाला नसल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राऊत पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे आमच्या पक्षा असताना अनेकदा बेळगावला जाऊ, अशी विनंती केली होती. आपणही या. परंतु, ते बेळगावला कधीही गेले नाही. मग, आता मुख्यमंत्री म्हणून ते असे काय दिवे लावणार आहेत?”, अशी टीका त्यांनी केली.

बेळगावातील मराठी भाषिक तरुणांवर, आंदोलकांवर असलेले खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते खोटे गुन्हे आधी मागे घ्यावे. आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान उघड्या डोळ्यांनी बघतात आणि अपमान करणाऱ्यांचा हे सरकार बचाव करतात. तर हे सरकार सीमा भागातील बांधवांना काय न्याया देणार?”, असा सवाल राऊतांनी केला आहे.

 

Exit mobile version