Site icon HW News Marathi

शिवसेनेचा स्वतंत्र गट करण्यासाठी 12 खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; एकनाथ शिंदेंची माहिती

नवी दिल्ली | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबद्दलची भूमिका आम्ही घेतली आहे. या भूमिकेला 12 खासदारांनी समर्थन केले आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले. शिवसेनेचे लोकसेभेतील गटनेते म्हणून राहुल शेवाळे आणि आमचे मुख्य प्रतोद भावना गवळी यांच्या नावांचा उल्लेख केला.  12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांची आज (19 जुलै) भेट घेत लोकसभेत वेगळ्या गटाची मागणी करत गटनेता बदलण्यासाठी त्यांना पत्र दिले आहे.  शिंदेंनी 12 खासदारसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

एकनाथ शिंदे म्हणाले, “जे खासदार 15 ते 20 लाख मतदारातून किंवा त्यापेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहेत. जेवढ्या मोठ्या मतदारांचे जे नेतृत्वा करतात. अशा खासदारांनी देखील बाळासाहेबांच्या विचाराचे देखील स्वागत केलेले आहे. आणि आज या 12 खाजदारांनी लोकसभा अध्यक्षांना जे पत्र दिलेले आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातील जनतेसाठी जे काही चांगले काम करता येईल. आमचे सरकार म्हणजे लोकांचे सरकार यात कुठेही कमी पडणार नाही, अशी आमची भूमिका आहे.”

मॅटिनी शो बंद झालेला, शिंदेचा राऊतांना टोला

हे सर्व खासदार दबावामुळे शिंदे गटात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना केले, यावर ते म्हणाले, “यासंदर्भात आमचे गटनेते बोलतील, आणखी कोणी या विषयावर बोलले असते तर दखल घेण्यासारखे होते. पण, जे रोज सकाळी मॅटिनी शो बंद झालेला आहे. पूर्वीसारखा. राऊत म्हणतात हा कॉमेडी एक्स्प्रेस सीझन 2 आहे, असे राऊत म्हणतात, शिंदे म्हणाले, “मला त्यावर बोलण्याची अवश्यकता वाटत नाही. कारण ते दखल घेण्यासारखे नाही. हे तुम्हाला ही माहिती आहे. पण, तुम्हाला रोज काही ना काही बातम्या पाहिजे असतात.”

 

 

Exit mobile version