Site icon HW News Marathi

“एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला…,” नारायण राणेंचे सूचक वक्तव्य

मुंबई | “एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. नाहीतर आनंद दिघेंच्या बाबतीत जे काही झाले, ते त्यांच्या बाबतीतही घडले असते, ” असे सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केले  आहे. एकनाथ शिंदेंनी पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. एकनाथ शिंदेचा निर्णय योग्यच असल्याची राणेंनी आज (21 जून) पत्रकार परिषद म्हणाले.

राणे म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. नाहीतर आनंद दिघेंच्या बाबतीत जे काही झाले, ते त्यांच्या बाबतीतही घडले असते. आनंद दिघेंच्या बाबती जे घडण्याआधी त्यांच्यासाठी मातोश्रीची दारे बंद झाली होती. यामुळे एकनाथ शिंदेचा निर्णय योग्य आहे. उद्धव ठाकरेंना शिवसेनेते कोणीही प्रवाभी झालेले चालत नाही. याआधी छगन भुजबळांचे राज्यात नाव लौकिक होत होते. तेव्हा त्यांची काटछाट केली आणि मी बाळासाहेंबांना पत्र लिहिले होते की उद्धव ठाकरेंना यावरून पक्षातच तेढ निर्माण काम केले आहेत.”

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा

एकनाथ शिंदेंना वारंवार मुख्यमंत्री पद देणार असे सांगण्यात आले. परंतु, मुख्यमंत्री पदाची वेळी आली तेव्हा स्वत: मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळता आले नाही. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिंकाशी घ्याच्या नाही फक्त मातोश्रीवरून आदेश द्यायचे. यामुळे शिवसेनेवर आज ही वेळ आली आहे. यावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला पाहिजे. शिवसेनेचे 56 मधील 35 आमदार फुटले तरी देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही. एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. नाहीतर आनंद दिघेंच्या बाबतीत जे काही झाले, ते त्यांच्या बाबतीतही घडले असते. आनंद दिघेंच्या बाबती जे घडण्याआधी त्यांच्यासाठी मातोश्रीची दारे बंद झाली होती.”

 

संबंधित बातम्या
विधान परिषदेच्या निकालानंतर ‘मविआ’मध्ये मोठा स्फोट; शिवसेनेचे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल 
एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे नॉट रिचेबल आमदार गुजरातमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामी
एकनाथ शिंदे हे आमचे जिवाभावाचे सहकारी! – संजय राऊत
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर पहिल्या ट्वीटमध्ये बाळासाहेबांची आठवण करत म्हणाले…!

 

 

Exit mobile version