Site icon HW News Marathi

“नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही शिंदेंना ठाकरेंनी सुरक्षा का नाकारली,” सुहास कांदेंचा सवाल

मुंबई | नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमक्या आल्या होत्या. यानंतर तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरक्षा देऊ नका, असा गौप्यस्फोट बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. कांदेंच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शिंदे गडचिरोलीचे पालक मंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या. यासंदर्भात कांदेंनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत.

सुहास कांदे म्हणाले, ” नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी तत्कालीन सरकारला दिला होता. यानंतर राज्यातील गृहमंत्री आणि गृह राज्यमंत्री या दोघांनी शिंदेंना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा विचार केला होता. परंतु, उद्धव ठाकरेंनी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास तत्कालीन काळात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून शिंदेना झेड प्लस सुरक्षा पुरवू नका, असा दावा त्यांनी केला होता.

“एक मराठी माणूसला जो नक्षलवाद्यांविरोधात लढतो, त्याला जीवे मारण्याची धमकी येते. तरी सुद्धा आपण त्याला का? सुरक्षा पुरवली नाही. आणि इतरांना जे हिंदुत्वाच्या विरोधात होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा का पुरवल्या?,” असा सवालही कांदेंनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

 

 

 

 

Exit mobile version