HW News Marathi
राजकारण

मोठी बातमी! एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री

मुंबई | एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहे, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. फडणवीस आणि शिंदेंनी राज्यापल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली. एकनाथ शिंदे हे आज (30 जून) सायंकाळी 7.30 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. भाजपच्या समर्थनात राज्यात शिंदेचे सरकार स्थापन होणार आहे. आज फक्त शिंदेंचा शपथ विधी होणार असल्याची माहिती फडणवीसांनी पत्रकार परिषद दिले आहे.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून आभारी मानतो. ही एक ऐतिहासिक घटना आहे. कोणला काही तरी पदे पाहिजे. मुख्यमंत्री पद पाहिजे. मी देखील कुठलीच अपेक्षा केली नव्हती. परंतु, जे काही घटलेले आहे. ते वास्तव आपल्यासमोर आहे. जी काही अपेक्षा या राज्यातील जनतेची आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र आम्ही सगळे जन मिळून एक करू आणि राज्याला विकासाकडे नेहण्याचे काम नक्की केले जाईल. देवेंद्रजी आमच्या पाठिंशी आहे. ऐवढ्या मोठा मनाचा माणूस आपण पाहू शकत नाही, मिळणार नाही. ते मंत्रिमंडळात नसून सुद्धा या राज्याच्या विकाससाठी ते आमच्या सगळ्याच्या सोबत आहेत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि आज, कालच्या राजकारणामध्ये काय घडेल हे आपण प्रत्येक जण पाहात असतो. परंतु, मिळत असताना, दुसऱ्यांना देण्याची जी काही उदारथा दाखविली आहे. आज, कालमध्ये खूप दुर्मिळ आहेत. ऐवढेच मी या प्रसंगी सांगतो. मी पुन्हा एकदा मनापासून सर्वांना धन्यवाद देतो.”

या आमदारांच्या ताकदीने इतिहास घडविला

“माझ्यासोबतचे जे 39-40 आणि 10, असे 50 आमदार आहेत. यात काही मंत्री आहेत. आणि आप आपल्या मतदारसंघता ते ताकदवान आमदार आहेत. असे असताना एकीकडे सत्ता आणि एकीकडे खूप मोठ मोठे नेते तर दुसरीकडे एकनाथ शिंदेसारखा एक छोटा कार्यकर्ता यांच्यावर विश्वास ठेवणे हे आज कालच्या काळामध्ये फार कठीण आहे. परंतु, या सर्व आमदारांनी ही लढाई या ठिकाणी लढली आहे. ऐक वैचारिक भूमिका घेऊन, बाळासाहेबांची घेऊन किंबहुना धर्मवीर आनंद दिघेची भूमिका घेऊन जेथे अन्याय घेऊन आवाज उठविणे. आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या 50 आमदारांनी केले आहे. या सर्व आमदारांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण तीच खरी ताकद आज इतिहास घडवू शकलेली आहे. म्हणून त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखविला. त्या विश्वासाला मी तडा जावू देणार नाही. जे काही त्यांना यापूर्वी आलेले अनुभव आहेत. त्यांची पुनवृत्ती देखील होणार नाही. अशा प्रकारची गव्हाही मी या ठिकाणी देतोय. कारण आपली ताकद आता वाढली आहे. इकडे 120 इतकडे 50  आणखी किती येतील ते माहिती नाही. एक मजबूत सरकार आपल्याला पाहायला मिळेल. त्याला आदरनीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा या सर्वांचे पाठबळ मिळेल. या राज्याबरोबर केंद्रीय सरकारची ताकद उभी राहते. विकासामध्ये कुठलेही अडथळे यावेळी येणार नाही. अशा प्रकारचे एक मजबूत सरकार आपल्याला पाहायला मिळेल. हे सरकार लोकांच्या मनातील आपेक्षा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कठिबध आहे. आणि राज्याची काही प्रगती आहे. वेगाने करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू.”

संबंधित बातम्या

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या पक्षाची एक्सपायरी डेट लवकरच संपणार !

News Desk

मी अभ्यंगस्नानानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही | आव्हाड

swarit

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर आमदार कैलास पाटलांचे उपोषण मागे

Aprna