HW Marathi
मनोरंजन राजकारण

‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाची स्थगिती

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात उद्या (१० एप्रिल) प्रदर्शन होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट विवादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदी चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे या चित्रपटावर स्थगिती आणली आहे.

View this post on Instagram

2 days to go! Thursday 11th April! #PMNarendraModi

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi) on

या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांची व्यक्तिरेखा अभिनेते मनोज जोशी साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडीत यांनी केली आहे. आनंद पंडीत केवळ निर्माते म्हणूनच नाही तर वितरक म्हणूनही भूमिका बजावत आहेत. परंतु  पीएम नरेंद्र मोदी जीवनावर आधारित चित्रपट केवळ भारतातच नाही, तर इतर देशांतही प्रदर्शित होणार होता. ओमांग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ओमांग कुमार यांनी यापूर्वी मेरी कोम, सरबजीत,भूमी यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या रिलीजच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाला तर आचारसंहिता भंग होईल का, याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले होते.

 

 

 

Related posts

…नाहीतर देशातील जनता आमच्यावर विश्वास ठेवणार नाही !

News Desk

Raj Thackeray ED Case | चौकशी झाली म्हणजे अटक होईलच असे नाही !

News Desk

नवी मुंबईतील शिवसेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

News Desk