HW News Marathi
राजकारण

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणुका

मुंबई | विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूका घेण्यात येणार आहेत. विधान परिषदेच्या या जागांसाठी होणा-या निवडणुकीसंदर्भात अधिकृत माहिती निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आली आहे. २७ जून रोजी रिक्त होणाऱ्या पदांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे.

विधान परिषदेचे सदस्य जयदेवराव गायकवाड, विजय गिरकर, माणिकराव ठाकरे, संजय दत्त, अनिल परब, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, शरद रणपिसे, सुनील तटकरे, महादेव जानकर आणि जयंत पाटील या नेत्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०१८ रोजी पूर्ण होत आहे.

१६ जुलै या दिवशी होणाऱ्या मतदानाचा निकाल त्याच दिवशी लागणार आहे. सायंकाळी ५ नंतर मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राने केरळ सरकारला पाठविले तब्बल १०२ कोटींचे बिल

News Desk

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नागरिक सजग, ३ हजार २११ तक्रारी दाखल

News Desk

‘दैनिक सामना’ मुख्य पानावर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात; राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या

Aprna