HW News Marathi
राजकारण

#Elections2019 : जाणून घ्या…हिंगोली मतदारसंघाबाबत

आपण महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल जाणून घेत आहोत. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यानंतर आता सर्व पक्ष, नेते आणि मतदारांनासुद्धा पुढील टप्प्यातील मतदानाची उत्सुकता लागलेली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या टप्यातील हिंगोली मतदारसंघाबाबत. हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात. ज्यामध्ये उमरखेड, हिंगोली, किनवट, हदगाव, बसमत आणि कळमनुरी यांचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून यावेळी कॉंग्रेसकडून सुभाष वानखेडे, शिवसेनेकडून हेमंत पाटील, तर वंचित बहुजन आघाडीकडून मोहन राठोड हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाचे डॉ. मारोती धानवे आणि इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण २८ उमेदवार हिंगोलीतून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत.

हिंगोलीमध्ये २०१४ ची स्थिती

हिंगोलीमधून २०१४ मध्ये कॉंग्रेसचे राजीव सातव, शिवसेनेचे सुभाष वानखेडे, तर बहुजन समाज पक्षाचे चुन्नीलाल जाधव हे लोकसभेसाठी उभे होते. त्यापैकी कॉंग्रेसचे राजीव सातव यांचा ४,६७,३९७ इतकी मतं मिळून विजय झाला होता. तर शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांना ४,६५,७६५ इतकी मतं मिळाली होती. त्यांच्या मतांचा फरक पहिला तर केवळ १६४१ इतक्या मतांनी कॉंग्रेसच्या राजीव सातव यांचा विजय झाला होता. त्यांच्या मतांची टक्केवारी पहिली तर कॉंग्रसला २९%, शिवसेनेला २९% तर बहुजन समाज पक्षाला केवळ १ % मतं मिळाली होती.

मतदारांची संख्या

हिंगोलीत १७,१६,७४७ एकूण मतदार संख्या आहे. येथे ८,१८,७९१ इतकी महिला मतदारांची संख्या असून पुरुष मतदारांची संख्या ८,९७,९४४ इतकी आहे.

कुठल्याही एका पक्षाला फार काळ सत्ता नाही

हिंगोलीतील इतिहास पहिला तर या ठिकाणी कुठलाही पक्ष खूप जास्त काळ सत्तेत राहू शकलेला नाही. या मतदारसंघात कधी कॉंग्रेस, कधी राष्ट्र्वादी कॉंग्रेस तर कधी शिवसेनेची देखील सत्ता होती. तर यावेळी येथे शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यामध्ये लढत होणार आहे. वसमत व हदगावला शिवसेना, हिंगोली व उमरखेडला भाजपा, किनवटला राष्ट्रवादी तर कळमनुरीत काँग्रेसचे आमदार सध्या प्रतिनिधित्व करत आहेत.

काँग्रेसच्या पक्षांतर्गत राजकारणात हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव यांना मोठे स्थान आहे. मात्र, हिंगोली लोकसभा मतदारसंघाला गेल्या ५ वर्षात त्यांच्या मोठेपणाचा फायदा झाला नाही, असे बोलले जात आहे. सातव यांना खासदार म्हणून विशेष अशी कामगिरीही करता आली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र या मतदारसंघातील जनसंपर्क, सातव यांनी शेतकरी व नागरिकांसाठी केलेली वेगवेगळी आंदोलने ही त्यांची जमेची बाजू असल्याचेही म्हटले जात आहे. तर आता हिंगोलीमधून कॉंग्रेसकडून सुभाष वानखेडे तर शिवसेनेकडून हेमंत पाटील रिंगणात उतरले आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड उभे आहेत. आता यावेळी कॉंग्रेस पुन्हा आपली सत्ता येथे राखते की निकाल काही वेगळे येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींनी मागितली सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी

News Desk

राजराजेश्वरी, आर. आर. नगर मतदारसंघातील निवडणूक स्थगित

News Desk

विकास करता आला नाही म्हणून भाजपने राम मंदिराचा मुद्दा उकरून काढला !

News Desk