HW News Marathi
राजकारण

#ElectionsResultsWithHW : साताऱ्यात उदयनराजेंची ९ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी

बारामती | यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (२३ मे) सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, यंदा महाराष्ट्रात अनेक मतदारसंघांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आणि चुरशीच्या लढती झाल्या आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघ हा अशा महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पिछाडीवर होते मात्र पुढच्या दीड तासांत उदयनराजे यांनी चक्क ९ हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागांवर एकूण ४ टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे सहदेव एवळे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. उदयनराजेंना आतापर्यंत २७,८७६ मते मिळाली आहेत. तर त्यांच्याविरुद्ध उभ्या ठाकलेल्या नरेंद्र पाटील यांना १८,२४७ मते मिळाली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अशी घटना घडणे हे धक्कादायक !

News Desk

‘मीटू’ मोहिमेच्या तक्रारीनंतर लवकरच कायदेतज्ज्ञाची समिती

swarit

रातोरात महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी भाजपमध्ये विलीन

News Desk