HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

उमेदवार निश्चितीसाठी ‘वंचित’कडून पार्लमेंटरी कमिटीची स्थापना

खामगाव । राज्यातील विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या ईच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील विधानसभा निवडणूक लढविणार्‍या ईच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसाठी पार्लमेंटरी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीत अण्णाराव पाटील, अशोक सोनोने, रेखाताई ठाकुर यांचा या कमिटीमध्ये समावेश आहे.

सदर कमिटी १३ जुलैपासून विदर्भातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार असून १३, १४, १५ जुलै रोजी अनुक्रमे नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा विभागात मुलाखती पार पडणार आहे. यासंदर्भात ईच्छुक उदेवारांनी नागपूर विभागात सागर डबरासे, रवि शेंडगे, नितेश जंगले, अमरावती येथे गुणवंत देवपारे, नंदेश अंबाडकर, चरणदास निकोसे, अकोला येथे प्रदीप वानखडे, प्रभाताई शिरसाठ यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Related posts

देशभक्तीला पर्यायी शब्द म्हणजे ‘चौकीदर’ !

News Desk

अशोक चव्हाण यांचा दावा खोटा, विधानसभा बरखास्त होणार नाही !

News Desk

स्वारातीम विद्यापीठाच्या एमएस्सी केमिकलची प्रवेश परीक्षा 17 जूनला 

News Desk