Site icon HW News Marathi

बहुमत चाचणीपूर्वीच ठाकरेंना धक्का! संतोष बांगर शिंदे गटात सामील

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारची आज अग्निपरीक्षा होणार आहे. या शिंदे सरकारचे आज (4 जुलै) बहुमत चाचणीला सामोरे जावे लागावे लागणार आहे. बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे आता शिंदे गटाची संख्या 39 वरून 40 वर झाली आहे.  यामुळे ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो. संतोश बांगर यांनी काल (3 जुलै) विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान केले होते.

यामुळे शिवसेनेकडे आमदारांची संख्या कमी राहिली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. शिंदेसह 39 आमदारांनी पक्षासोबत बंड केले. यानंतर तब्बल दहा दिवस हा सत्ता संघर्ष सुरू होता. बंडखोरी आमदारांनी आपणच शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला आहे. शिवसेना विधीमंडळात 2/3 आमदारांनाचा पाठिंबा असल्याचा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अखेर राज्याच शिंदेनी मुख्यमंत्री तर  शपथ घेतली.

संबंधित बातम्या
विधानसभेतील शिवसेनेचे कार्यालय सील
Exit mobile version