Site icon HW News Marathi

अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी ‘मविआ’ आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

मुंबई | राज्याचे हिवाळी अधिवेशना (winter session maharashtra) सुरू होऊन आठवडा उलटला आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमेंकांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. हिवाळी अधिवेशनाचा आज (26 डिसेंबर) सहावा दिवस असून विरोधकांनी बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या, अशा घोषणा दिल्या.

विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या ,मुख्यमंत्री राजीनामा द्या… द्या खोके, भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके… कर्नाटक सरकार हाय हाय… मिंथे सरकार हाय हाय… निर्लज्ज सरकार हाय हाय… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… गली गली मे शोर है खोके सरकार चोर है… संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे… धानाला भाव मिळालाच पाहिजे… अशा गगनभेदी घोषणा देत सहाव्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हिवाळी अधिवेशनाचा आजचा कामकाजाचा सहावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजपण विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

 

Exit mobile version